हा जीव असा जळलेला!
पण कुणास ना कळलेला!
मी गाणे म्हटले आणिक;
तो फकीर हळहळलेला
...
हे कसले बाण म्हणावे?
भाताही डळमळलेला!
शब्दांशी खेळत होता,
अर्थाने तळमळलेला!
काजव्यास मूर्ख म्हणाला
उल्केगत कोसळलेला
वेडाच असावा तो जो
विरहाने उन्मळलेला
सांगे तत्त्वांच्या गोष्टी;
जो स्वतःच ढासळलेला
जगण्याचा अवघड रस्ता!
कळता कळता वळलेला!!
पण कुणास ना कळलेला!
मी गाणे म्हटले आणिक;
तो फकीर हळहळलेला
...
हे कसले बाण म्हणावे?
भाताही डळमळलेला!
शब्दांशी खेळत होता,
अर्थाने तळमळलेला!
काजव्यास मूर्ख म्हणाला
उल्केगत कोसळलेला
वेडाच असावा तो जो
विरहाने उन्मळलेला
सांगे तत्त्वांच्या गोष्टी;
जो स्वतःच ढासळलेला
जगण्याचा अवघड रस्ता!
कळता कळता वळलेला!!
No comments:
Post a Comment